पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जीवनाचं GPS - "ज्योतिषशास्त्र" भाग २

नमस्कार मित्रांनो!!! आयुष्यचं GPS ज्योतिषशास्त्रच्या भाग १ मध्ये आपण बघितले की कशा प्रकारे ज्योतिषशास्त्र आपल्या आयुष्याला मार्ग दाखवून आपलं आयुष्य सोयिस्कर करू शकते. आता आपण ज्योतिषशास्त्राचे अजून काही फायदे बघूयात! आरोग्याच्या तक्रारी या आयुष्यभर सुरू असतात. तारुण्याच्या धुंदीत आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतोही , पण शरीराला कधीतरी त्याचा सोस जाणवतोच. मग असलेला पैसा , ज्ञान या सर्व गोष्टी निरर्थक वाटायला लागतात. आरोग्य हीच एकमेव संपत्ती असल्याची जाणीव होते. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. पण जर आपल्याला आधीच अंदाज असेल की आपल्याला आरोग्याच्या बाबतीत कोणत्या समस्या उद्भवू शकतात तर ? ही आयुष्यात किती मोठं वरदान ठरेल! ज्योतिषशास्त्राच्या मदतीने आपण एखाद्या व्यक्तिला शरीरातील कोणत्या अवयवाशी संबंधित त्रास होऊ शकतो याबाबत माहिती मिळवू शकतो. म्हणजे , कोणत्या व्यक्तिला किडनी संबंधित विकार होऊ शकतात , हृदय , पोट असे विकार होऊ शकतात असे संकेत मिळवू शकतो. तसं जर असेल तर ती व्यक्ति त्याबाबतीत आधीच जागरूकता ठेऊन तो आजार होण्यापासून स्वतःला वाचवू शकते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याव...

जीवनाचं GPS - "ज्योतिषशास्त्र" भाग १

आजचा युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे. मानवाने जशी जशी प्रगती केली त्यामध्ये तंत्रज्ञानातील नवीन संशोधनाने सामान्य माणसाचं आयुष्यही बदलून गेलं. ज्यावेळी विज्ञानाचा उपयोग सामान्य माणसाचं आयुष्य सोपं करण्यात होऊ लागतो तेंव्हा समाज व्यापक दृष्टीने परिपूर्ण होत जातो. मानवाच्या अशाच एका शोधापैकी एक आहे GPS! म्हणजे Global Positioning System! एक अशी यंत्रणा जी माणसाला दिशादर्शक ठरते. याचा वापर आपण अनेकदा केला आहे. गावाला जाताना रस्ता शोधण्यासाठी असेल किंवा गावातच एखादा पत्ता शोधत असताना आपण अगदी सहजरीत्या मोबाइल काढतो आणि त्यात मार्ग शोधतो. त्यात आपल्या आजूबाजूचा परिसर दिसतो , आपण सध्या कुठे आहोत याचं अवलोकन होतं आणि आपल्याला जिथे जायचं आहे तिथे जाण्यासाठी सहज सोपा मार्ग कोणता हेही दिसतं. एकंदरीत , आपल्या लक्षापर्यंत पोचण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन मिळतं. या घटनेत आपण त्या यंत्राचे , त्या संशोधनाचे केवळ एकतर्फी उपभोगते असतो. आपण ना त्याचा निर्माण केला आहे किंवा त्यामागील विज्ञानही आपल्याला माहीत नसतं. पण त्यावर अंधपणे विश्वास ठेवत आपण त्याचा सल्ला ऐकतो. असं असलं तरी त्यामागे एक प्रक्रिया ...

लॉक डाउन, आपली वास्तू आणि घ्यावयाची काळजी

मित्रांनो , सध्या कोरोना विषाणूचा उत्पात सुरू असल्याने केवळ भारतातच नव्हे तर जगभरात Lockdown ची अंमलबजावणी केली जात आहे. पुढील एक महिना तरी आपल्या सर्वांना आपल्या वास्तुतच बंदिस्त होऊन रहावं लागणार आहे. गेल्या अनेक ब्लॉगच्या माध्यमातून आपण जाणून घेत आलो आहोत की वास्तू ही त्या वास्तूत राहणाऱ्या सर्वांवर परिणाम करत असते. आता तर आपल्याला त्याच वास्तूत सलग रहायचं आहे. याच निमित्ताने आज आपण काही वास्तू टिप्स जाणून घेऊया जेणेकरून आपली वास्तू दोषमुक्त होण्यास मदत होईल. छोटे-छोटे बदल करून आपण अनेक आजारांना उंबरठ्याबाहेर ठेऊ शकतो आणि सध्या जे " Work From Home" करत आहोत त्यातही कार्यक्षमपणे यशस्वी होऊ शकतो. सर्वप्रथम आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत. ◆ घरातील जी अडगळ आहे त्यापासून मुक्त होणं गरजेचं आहे. त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळत असतं. जर घराच्या आग्नेय किंवा ईशान्येकडील कोपऱ्यात अडगळ असेल तर तातडीने ती मोकळी करावी. त्याची जागा घराच्या नैऋत्येस आहे. ◆ घरात सकाळचा सूर्यप्रकाश येणे फार आवश्यक असते. त्यामुळे पूर्वेकडील दरवाजे , खिडक्या...

वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, रत्नशास्त्र यामुळे आपल्या जीवनात होणारे फायदे

ॐ भूर्भूवः स्वः। तत्सवितुर्वरेण्यं। भर्गो देवस्य धीमहि। धीयो यो नः प्रचोदयात्। मंत्राचा अर्थ  : विश्वाची उत्पत्ती ज्याच्यापासून होते ; त्याचे आम्ही ध्यान करतो. तोच सच्चिदानंदरूप आहे. तो अज्ञानाचा नाश करतो.तो आमच्या बुद्धीला प्रेरणा देतो. त्याच्या तेजाचे आम्ही ध्यान करतो. आमची सत्कर्मे -सद्विचार-सदाचार-संभाषणे सद्वर्तनाकडे प्रवृत्त होवोत. गायत्री मंत्राच्या या ओळी आयुष्याला मार्ग दाखवणार्‍या आहेत. याच प्रकाशाच्या मार्गाने वाटचाल आयुष्य सुकर करते! आजपर्यंत विविध ब्लॉगच्या माध्यमातून आपण वास्तुशास्त्र , ज्योतिषशास्त्र , अंकशास्त्र , रत्नशास्त्र अशा विविध शास्त्रांच्या बाबतीत माहिती घेतली. कुठल्याही शास्त्राचीउत्पत्तिहीमानवी जीवनाला सुरक्षिततेकडे व संपन्नतेकडे घेऊन जाण्यासाठीच झालेली असते. आपण ज्या शास्त्रांच्या संदर्भात चर्चा केली त्यांच्यातसुद्धा हाच समान दुवा आहे . या सर्व शास्त्रांच्या सहाय्याने आपण सुरक्षित वसंपन्न आयुष्याच्या दिशेने वाटचाल करू शकतो! मनुष्यप्राणी दिवसरात्र एक करून मेहनत करत असतो , शिक्षण घेत असतो , नोकरी-व्यवसाय करत असतो ते आपल्यासह आपल्या कुटुंब...

वास्तुशास्त्र आणि ऑफिस

कुठलीही मानवनिर्मित जागा ही वास्तु असते. त्या वास्तूच्या रचनेनुसार एकतर ती वास्तु लाभते किंवा त्या वास्तूत दोष तरी असतो. आजपर्यंत आपण वास्तूमध्ये घर , म्हणजे ज्या ठिकाणी आपलं कायम वास्तव्य असतं याबद्दल बोलत आलो आहोत. पण आजच्या आधुनिकीकरणाच्या युगात काम करणार्‍या पुरुष अन स्त्रियांचा बराचसा वेळ कार्यालयात अर्थात ऑफिसच्या ठिकाणी जात असतो. नोकरी अथवा व्यवसाय करताना जी जागा आपण प्रत्यक्षात वापरतो त्याला आपण ऑफिस म्हणूयात! मग तुम्ही एखाद्या बँकेत नोकरी करत असाल , आयटी क्षेत्रात नोकरी करत असाल , स्वतःचं ऑफिस असेल किंवा दुकान असेल अशा प्रत्येक ठिकाणी वास्तु ही आपलं काम करतच असते. मग ते काम इष्ट फळ देण्याचं असो किंवा अनिष्ट!आणि त्यानुसारच तुमच्या पदरी यश-अपयश पडत असतं.             ऑफिस हे आपल्या आर्थिक प्रगतिचे आणि आपल्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणारं स्थान आहे. तुम्ही जिथे काम करत असता त्या वास्तूत जर दोष असतील तर तुम्हाला आर्थिक प्रगती करताना अडथळे येऊ शकतात. कारण ज्या ठिकाणी आपल्या शारीरिक व बौद्धिक ऊर्जेचा सर्वाधिक वापर होतो अश...

वास्तु आणि विवाहयोग

प्रत्येक कुटुंबात सर्वाधिक आनंदाचा क्षण म्हणजे विवाह! विवाह हा कुटुंबातील आणि वास्तूमधील सर्वाधिक मंगल क्षण मानला जातो. आपल्याकडे लग्न हे केवळ दोन जीवांचं एकत्र येणं नसून दोन कूटुंब त्यामुळे एकत्र येत असतात. लग्नकार्यानंतर संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून जात असतं. शिवाय , लग्न म्हणजे आपल्या घराण्याच्या पुढच्या पिढीच्या भविष्याचा योग असतो. पण आजच्या काळात “विवाह” ही एक मोठी समस्या बनला आहे. विवाह न जमणे आणि विवाहातून सुखप्राप्ती न होणे यामुळे लग्नसंस्थेवर विश्वास नसणार्‍यांची संख्या वाढत आहे. पण हे असं का घडत आहे याकडे कोणीही अभ्यासपूर्वक बघत नाही. विवाहयोग नसणे ही आजच्या काळातील मोठी समस्या झाली आहे. अनेक चांगल्या , संपन्न असलेल्या कुटुंबातील गुणी मुला-मुलींची लग्न लवकर जुळत नाहीत. सर्वकाही असून अपेक्षेसारखा जोडीदार न मिळणे यामुळे केवळ विवाहइच्छुक तरुण-तरुणीचं नाही तर त्यांचे कुटुंबियही काळजीत असतात. संपत्ती , रूप , चांगलं कूटुंब अशा सर्व जमेच्या बाजू असताना विवाह जुळत नाहीत याला वास्तूतील दोष कारणीभूत असतो. आपल्या घराची बांधणी आणि विवाहइच्छुक मुला-मुलींची राहणी या विवाह न जुळणे...

ज्योतिष आणि कर्मफळ

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥ अर्थ: तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे , त्याच्या फळांवर नाही ; म्हणून तुझा कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा नको ; ( पण) कर्म न करण्यामध्येही तुझी आसक्ती नको. भगवतगीतेच्या दुसर्‍या अध्यायातील हा श्लोक आहे. भगवंतानेही स्पष्टपणे कर्म करण्यास सांगितलं आहे. जोपर्यंत आपण कर्म करणार नाहीत तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही.                    ज्योतिषशास्त्र हे आपल्याला योग्य कर्म करण्याची दिशा दाखवणारं शास्त्र आहे. सामान्य माणसाला वाटतं की आकाशातील ग्रह-तारे आपलं भविष्य कसं ठरवू शकतात ? पण आकाशातील ग्रह-तारे हे आपल्याला वर्तमानात कोणता मार्ग अवलंबला पाहिजे यासाठीचा प्रकाशमार्ग दाखवत असतात. ज्या काळात आजच्या भौतिकशास्त्राचा किंबहुना दुर्भिणीचाही शोध लागला नव्हता त्याकाळात आपल्या ऋषीमुनींनी ज्योतिषशास्त्र विकसित केलं आहे. त्याअनुसार भविष्यातील परिस्थितीचा अंदाज घेता येतो आणि वर्तमानात काय निर्णय घ्यावेत हे समजून येतं...

वास्तु: भाड्याचे घर व गृहप्रवेश

एखाद्या वास्तुमध्ये दोष असतो म्हणजे काय ? याबद्दल आपण आधीच्या ब्लॉगमधून काही अंशी जाणून घेतलं आहे. पण वास्तुदोषाचे परिणाम किती गंभीर होऊ शकतात याची तीव्रता आज आपण समजून घेणार आहोत. वास्तुशास्त्राबद्दल बोलत असताना आपण दहा दिशा , गुरुत्वाकर्षण , वैश्विक ऊर्जा अशा अनेक घटकांचा विचार करत असतो. यातील प्रत्येक दिशेशी एक तत्व निगडीत आहे. प्रत्येक ऊर्जेचा मानवी शरीर व मनावर थेट परिणाम असतो. जर यामध्ये असंतुलन निर्माण झालं तर त्याचे विपरीत परिणाम वास्तुमध्ये राहणार्‍या मानवांवर होत असतात. कुटुंबाला सुख लाभतच नाही , कुठल्याच क्षेत्रात यश येत नाही , घरातील तरुण पिढी वाईट मार्गावर जात असणे , सतत आर्थिक नुकसान होत राहणे , हितशत्रूंपासूनत्रास होणे अशा समस्या ज्या सर्वसामान्य कुटुंबात सहजासहजी दिसून येत नाहीत त्या वास्तुदोष असलेल्या कुटुंबात दिसून येतात. आधी सांगितल्याप्रमाणे , आग्नेय ही अग्नि तत्वाची दिशा आहे , ईशान्य जल तत्वाची आहे तसं सर्वच दिशेला पंचमहाभूतांतील एका तत्वाशी बांधलं गेलं आहे. त्या दिशेत जर गंभीर दोष असतील तर त्याचे अतिशय गंभीर परिणाम भोगावे लागतात. खासकरून घरातील सदस्यां...

ज्योतिष आणि गैरसमज

आपण याआधीच्या ब्लॉगमधून ज्योतिष म्हणजे काय याबद्दल माहिती घेतली होती. ज्योतिष या शब्दाची फोड ज्योत + भविष्य अशी करता येईल. याचा अर्थ या शास्त्रातून भविष्याचा वेध घेता येतो हे स्पष्ट आहे. पण चित्रपटात दाखवतात तसं ही काही Time Machine नाही की आपण आरपार पाहू शकतो. ज्योतिषशास्त्रात अनेक बाबींचा अभ्यास करून जे निष्कर्ष काढतात तेसंकेत असतात , अंदाज असतात. आयुष्य खूप मोठं आहे. त्यात स र्वांनाच सुखाचा हव्यास आहे. मग या दीर्घ आयुष्यात सुखाकडे वाटचाल करायची असेल तर योग्य मार्गदर्शन असायलाच हवं. भविष्यात काय वाढून ठेवलं आहे , कोणते धोके असू शकतात , काय संधी असू शकतात , कोणत्या मार्गाने वाटचाल केली पाहिजे , कुठे ठेच लागू शकते आणि कुठे जरासा विसावा घेतला पाहिजे हे सर्व ज्योतिषशास्त्राच्या आधारे जाणून घेता येतं. एक उदाहरण द्यायचं झालं तर , एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीच्या अभ्यासाअंती असा निष्कर्ष निघू शकतो की येणार्‍या काळात ग्रहमान प्रतिकूल असून पोट , हृदय संबंधित विकार उद्भवू शकतात तर साहजिकच ती व्यक्ति काळजी घेऊन ते टाळू शकते. किंवा जर ग्रहमान अनुकूल असेल आणि पत्रिकेत धनलाभ योग दिसून येत ...

वास्तुशास्त्र: धन आणि आरोग्य : भाग २

आर्थिक सुख मिळाल्यानंतर आरोग्यचं सुखही अतिशय आवश्यक आहे. आपल्याकडे पैसा कितीही असूद्या पण जर त्याचा उपभोग घेण्यासाठी उत्तम आरोग्य नसेल तर सर्वकाही निष्फळ आहे. जीवन हसत हसत जगून समाधानाने मृत्यू येणे हीच सुखी आयुष्याची व्याख्या आहे. यामध्ये संपन्न व दोषमुक्त वास्तु सर्वात महत्वाची भूमिका निभावते असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. वास्तूचा सर्वाधिक परिणाम होत असेल तर तो म्हणजे त्या वास्तूत सतत निवास करणार्‍या मानवी शरीर व मनावर. विविध दिशेने येणार्‍या सकारात्मक-नकारात्मक वैश्विक ऊर्जा, गुरुत्वाकर्षण हे वास्तूत राहणार्‍या शरीर-मनावर परिणाम करतात आणि त्यातूनच शारीरिक व मानसिक आरोग्याची जडणघडण होत असते.  काही घरांमध्ये सतत आरोग्याच्या तक्रारी सुरू असतात. एक झालं की दुसरं दुखणं सुरूच असतं. दुर्दैवाने अकाली मृत्यूही होतात. घरात सतत वाद-विवाद होत असतात. मानसिक अस्वास्थ्य जाणवत असतं. असं होऊनही माणसं वर्षानुवर्षे ते निमूटपणे सहन करतात. पण त्यावर सोपे उपाय अवलंबून आहेत. त्यात खूप खर्च करणे अथवा जागेची तोडफोड करणे अशी आवश्यकता नाही. आपल्या वास्तूत छोटे-मोठे बदल करून आणि काही सुचना...

वास्तुशास्त्र: धन आणि आरोग्य: भाग १

वास्तुशास्त्र म्हणजे काय याची माहिती आपण यापूर्वीच्या ब्लॉगमधून घेतली आहे. आपल्या आयुष्यातील अनेक छोट्या-मोठ्या समस्यांपासून सुटका मिळविण्यासाठी सामान्य माणूस संपन्न वास्तूचा अट्टहास धरत असतो. ज्यावेळी त्याला अडचणी येतात किंवा सर्व सुरळीत सुरू असताना काही अशुभ होऊ नये या चिंतेने तो वास्तुशास्त्र या विषयाकडे वळतो. आरोग्य , धन , शिक्षण , प्रतिष्ठा , करियर , विवाह असे अनेक विषय आपण वास्तुच्या अनुषंगाने अभ्यास करू शकतो. जर त्यासंबंधी काही समस्या असतील तर त्यावर उपायही करू शकतो. आपली वास्तु सुख देणारी असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. आणि सुखाची व्याख्या ही आर्थिक व आरोग्याच्या सुखाच्या जवळ येऊन थांबते. आपल्याकडे धनसंपत्ती असावी आणि उत्तम आरोग्य असावं जेणेकरून आपण सुखी होऊ शकतो असं सर्वांनाच वाटत असतं. त्यामुळे आपण धन आणि आरोग्य यांचा वास्तूशी संबंध काय असतो , शिवाय धन व आरोग्य प्राप्तीसाठी वास्तु कशी असावी , त्यात छोटे-मोठे काय बदल करावेत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आधी आपण धन या विषयावर जाणून घेऊ! आर्थिक सुबत्ता ही आजच्या काळातील गरज आहे. वाढणारी महागाई , शहरी जीवनशैली , ...

वास्तुशास्त्र: सुखी जीवनाचं सूत्र

प्रत्येक माणूस सुखाच्या शोधात असतो. आयुष्यभर हा शोध सुरूच असतो. पण आयुष्यात एकाच वेळेस सर्व सुख मिळत नसल्याने माणूस समाधानाने जगू शकत नाही. आरोग्य , धन-संपत्ती , नातेसंबंध , शिक्षण या सर्व गोष्टी एकाच वेळेस मिळत नाहीत. एक आहे तर दुसरं नाही अशी अवस्था असते. त्यामुळे समाधानाने जगता येत नाही. पण समाजात असे काही व्यक्ति असतात , अशी काही कुटुंबं असतात ज्यांना समाधान लाभतं! त्यांच्या अशा निस्सीम जगण्याच्या मागे अनेक कारणं असू शकतात . पण जर याचा सखोल विचार केला तर त्यामागे एक परिपूर्ण वास्तु असल्याचं आढळून येईल. समाधानी आयुष्यासाठी निरोगी शरीर , निरोगी मन आणि पूर्ण कार्यशीलतेने काम करणे महत्वाचं आहे. जर आपली वास्तु दोषमुक्त असेल तर आपण सुखी जीवनाच्या मार्गावर असतो असं खात्रीने म्हणता येईल. ज्या ठिकाणी आपण बहुतांश वेळ राहतो , जेवतो , झोपतो , अभ्यास करतो , महत्वाचे निर्णय घेतो ती वास्तु जर आपल्यावर प्रभाव टाकणारी असेल तर ती निर्दोष व परिपूर्ण असलीच पाहिजे. आपण आधीच्या ब्लॉगमध्ये वास्तुशास्त्र म्हणजे काय हे जाणून घेतलं होतं. माणसाने स्वतःच्या निवार्‍यासाठी एखादी झोपडी जरी बनवली असेल...