पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Vaastushastra & Marriage

इमेज
 Vastu and Marriage  वास्तुशास्त्रा प्रमाणे वातावरणात पंचमहाभुतांचे अस्तित्व हे मुक्त स्वरुपात असते. परंतु जेव्हा त्यांना चार भिंतीमध्ये बंदिस्त केले जाते त्या वेळेस त्यांचे आठ दिशांबरोबर संबंध प्रस्थापित होतात. चार मुख्य दिशा, चार उपदिशा या बरोबर आकाशाकडील दिशा म्हणजे अनंत ही नववी अधर म्हणजे भूमी ही दहावी दिशा. अशा दहा दिशांचा विचार वास्तुशास्त्रात केला गेला आहे. वास्तुरचने नुसार दिशांचा, पंचतत्त्वाचा, भूमीच्या उर्जेचा परिणाम वास्तुत राहणार्‍या व्यक्तींवर होत असतो. वास्तुशास्त्राच्या मुळ ग्रंथामध्ये भूमी व भूमी ऊर्जा यांचा सर्वाधिक विचार केलेला असून प्रत्येक ग्रंथात एक तृतिअंश लेखन वास्तूसाठी भूमीची निवड कशी करायची यावरच आहे. भूमीची शुभता अशुभता भूमीतून प्रस्फुटीत होणार्‍या ऊर्जेवर अवलंबुन असते. भूमीच्या ऊर्जेचा दुरगामी परिणाम मनुष्य जीवनावर झाल्याचे दिसून येते. भूमी बरोबरच अष्टदिशा (काही ग्रंथाप्रमाणे सोळा दिशा), पंचतत्त्व या ऊर्जेचा परिणाम हा त्या वास्तुत राहणार्‍या व्यक्तीवर होतो. यास्तव मनुष्य ज्या वास्तुत राहतो त्या वास्तुतील ऊर्जेचे परिणाम त्याच्या विचारांवर प्रभाव ...