सोमवार, ६ ऑगस्ट, २०१२

Ratna Vishwa

रत्नविश्व 

माझ्या रत्नविश्व ह्या आगामी पुस्तकातील काही भाग   

 

मूनस्टोन

           हे चंद्रग्रहाचे रत्न असून मोती रत्नाल पर्याय म्हणून या रत्नाचा विचार  होतो. हे मोती  रत्नाचे उपरत्न म्हणून  जरी  प्रचलित असले तरी सुद्धा याचे  स्वतःचे असे वेगळे गुणधर्म आहेत. पांढरट धुरसर चमक असलेले, मधूनच निळसर छटा दिसणारे हे रत्न सुखी व समृद्ध वैवाहिक जीवनासाठी वधु-वरास भेट देण्याची प्रथा अनेक ठिकाणी दिसून येते. काही लोकांची अशी धारणा आहे कि हे रत्न पौर्णिमेच्या रात्री तोंडात धरल्यास भविष्यात घडणाऱ्या घटना समजतात. हे रत्न चांदाशी सामंधित असल्याने मनाची एकाग्रता साधून अंतरञान होण्यास मदत करते. ज्या प्रमाणे चंदाच्या स्थिती मध्ये रोज बदल होत असतो  त्या प्रमाणे जीवनात येणाऱ्या स्थित्यंतरास शांत संयमित राहून सामोरे जाण्यास मदत करते.
          हे रत्न धारण करणाऱ्यास शारीरिक दृष्ट्या शांत ठेवते, कोणत्याही परिस्थितीत संयम ढळू देत नाही व अतिरेकी प्रतीशिप्त क्रियांवर नियंत्रण ठेवते. हे  रत्न  अंगच्या गुणांना वाव निर्माण करून देण्यास मदत करीत असल्याने जे स्वताचे विचार, अंगी असणारे गुण प्रगट करू शकत नसतील, किवा स्वताच्या अंगी असलेल्या गुणांची जाणीवच नसेल अशांसाठी अंगचे गुण प्रगट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. भावनिक समतोल ठेऊन मनाला काबूत ठेवण्यास मदत करते तर संतुलित विचाराने घेतलेल्या निर्णयावर अंमल करण्यास भाग पाडते.
       मनाशी सामंधित असणारया चंद्र ग्रहाचे हे रत्न असल्याने ह्या अंमल मनावरती विशेतः दिसून येतो, बिघडलेल्या मानसिक स्थितीत नाकारात्मता दूर करण्यास मदत करून मानसिक स्थिती सचेतन, आनंदी  ठेवण्यास मदत करतो म्हणून या रत्नाला  "सकारात्मक सवरक्षक" हि म्हणतात. ज्या व्यक्तींना रोजच्या कामामध्ये जास्त मानसिक, शारीरिक ताण पडतो अशांसाठी तसेच ज्या व्यक्ती जुनी भावनिक सल, अपधीपणा मनामध्ये घेऊन वावरत असतात अशा भावनिक जखमावर मात करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तसेच ज्यांना पाण्याची भीती वाटते त्यांची भीती दूर करून सुरक्षितता देते, म्हणून जल प्रवासात व जलक्रीडेत हे रत्न वापरण्याची प्रथा आहे.
      मूनस्टोन हे मनाला संयमित व शांत करीत असल्याने संतापी, चीड-चिड्या व्यक्ती साठी तर हट्टी व त्रास देणाऱ्या मुलांसाठी उपयोगाचे आहे. ह्या रत्नाच्या वापराने शांत झोप लागते, त्यामुळे निद्रानाशाचा आजार असणार्यांनी जरूर वापरावे. ज्यांना झोपेत चालण्याची वाईट सवय असते अशी सवय मोडण्यास मदत करते. स्त्रियांमध्ये स्त्री तत्वाची जाणीव करून देऊन मासिक चक्र नियमित ठेवण्यास मदत करीत असल्याने मासिकपाळीच्या तक्रारी असणार्या स्त्रियांनी वापरणे चांगले. ह्या रत्नाच्या वापराने चया-पचाय क्रिया सुधारते तर यकृताला बल प्राप्त होऊन शरीरात साठलेले अनावश्यक विषद्रव्य बाहेर टाकण्यास मदत करते, ह्याच कारणाने स्थूल व्यक्तींना वजन कमी करण्यास मदतगार ठरते. तसेच हे रत्न जल तत्वाचे असल्याने शरीरातील पाण्याचा समतोल राखण्यास उपयोगी ठरते
 डॉ.अभय अगस्ते