Vastushastra va Vidnyan
'वास्तुशास्त्र ' हा शब्द उच्चारल्या बरोबर अनेक प्रकारचे मत प्रवाह आपल्या समोर येतात, या मध्ये कोणी या शास्त्राचे अंधपने समर्थन करतात तर कोणी याला शुद्ध फसवणूक मानून जीवतोडून विरोध करतात. या दोन्ही भूमिका ह्या टोकाच्याच, वास्तविक पाहता एक दोन नियमांची पूर्तता होणे किवा न होणे म्हणजे कोणतेही शास्त्र होत नाही समर्थन करणार्यांना तरी पूर्णपणे माहिती असते असे नाही, एखादा दुसरा अनुभव काय तो पाठीशी असतो तर दुसरीकडे जुजबी माहितीच्या आधारे स्वतःला विज्ञाननिष्ट म्हणून घेण्याच्या नादात निव्वळ विरोधाला विरोध होताना दिसतो. तसे पाहता कोणतेही शास्त्र हे शास्त्र म्हणून स्वीकारताना त्या शास्त्रातील प्रत्तेक नियमांना विविध कसोटीवर तपासून पहिले पाहिजे. ज्या प्रमाणे प्रत्तेक शास्त्रातील नियम हे स्थळ, काळ, वेळ सापेक्ष असतात आणि म्हणूनच त्या नियमांना अपवाद हि असण्याची शक्यता असते, त्याच प्रमाणे वास्तुसास्त्राचा तर्कशुद्ध विचार होणे आवश्यक आहे. निसर्गाच्या प्रत...