पोस्ट्स

2012 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
Ratna Vishwa -Part 2    ऱ्होडोनाइट              ऱ्होडोनाइट  हे नाव ग्रीक नाव असून त्याच्या गुलाबी-लाल रंगा वरून पडले आहे, सामान्यपणे ऱ्होडोनाइट हा गुलाबी-लाल रंगाचा आसतो परंतु कधी कधी हे रत्न विटकरी-तपकिरी रंगात हि सापडते, ह्या रत्ना मध्ये थोड्या प्रमाणावर manganese oxide असल्या कारणाने काही ठिकाणी काळे डाग किवा काळ्या रंगाच्या रेषा, छटा दिसून  येतात.                इतर गुलाबी रंगाच्या रत्ना प्रमाणे हे सुद्धा प्रेमा ची उर्जा प्रवाहित करते आणि याचे वैशिष्ठ्य म्हणजे हा प्रेमाचा वर्षाव बाहेरील बाजूस होत असल्या कारणाने भावनिक समतोल साधून माणुसकी वाढवण्यास मदत करते. हे रत्न व्यक्ती व परिस्थिती या दोन्हींना आकर्षित करून अंगी असणाऱ्या असाधारण किंवा वैशिष्ठ्यपूर्ण गुणाचा उपयोग करण्यास मदत करते. हे रत्न हृदय चक्राशी संमंधित असल्या कारणाने प्रेमाची परीपूर्णता होण्यास तसेच कोणावर प्रेम करण्यास व प्रेम मिळवण्यास प्रेरक ठरते.  ...

Ratna Vishwa

इमेज
रत्नविश्व   माझ्या रत्नविश्व ह्या आगामी पुस्तकातील काही भाग      मूनस्टोन            हे चंद्रग्रहाचे रत्न असून मोती रत्नाल पर्याय म्हणून या रत्नाचा विचार  होतो. हे मोती  रत्नाचे उपरत्न म्हणून  जरी  प्रचलित असले तरी सुद्धा याचे  स्वतःचे असे वेगळे गुणधर्म आहेत. पांढरट धुरसर चमक असलेले, मधूनच निळसर छटा दिसणारे हे रत्न सुखी व समृद्ध वैवाहिक जीवनासाठी वधु-वरास भेट देण्याची प्रथा अनेक ठिकाणी दिसून येते. काही लोकांची अशी धारणा आहे कि हे रत्न पौर्णिमेच्या रात्री तोंडात धरल्यास भविष्यात घडणाऱ्या घटना समजतात. हे रत्न चांदाशी सामंधित असल्याने मनाची एकाग्रता साधून अंतरञान होण्यास मदत करते. ज्या प्रमाणे चंदाच्या स्थिती मध्ये रोज बदल होत असतो  त्या प्रमाणे जीवनात येणाऱ्या स्थित्यंतरास शांत संयमित राहून सामोरे जाण्यास मदत करते.           हे रत्न धारण करणाऱ्यास शारीरिक दृष्ट्या शांत ठेवते, कोणत्याही परिस्थितीत संयम ढळू देत नाही व अतिरेकी प्रतीशिप्त क्रियांवर नि...
गुरुपुष्यामृत योग उद्या दि.19 / 07/2012 रोजी गुरुपुष्यामृत योग आहे. ज्याच्या नावातच अमृत आहे असा हा शुभ योग. परंतु उद्या येनाऱ्या या योगाचे महत्व आणखीनच वाढलेले आहे।          ज्योतिष शास्त्र दृष्टीने पुष्य नक्षत्रास नक्षत्राचा राजा असे म्हणतात, प्र्त्तेकाच्या कर्माचे माप न्याय बुद्धीने त्यांच्या पदरात टाकणाऱ्या शनी महाराजांचे हे नक्षत्र आहे. सागर मंथनाच्या वेळेस ह्याच नक्षत्रावर विष्णुस लक्ष्मी ची प्राप्ती झाली होती ह्या कारणाने अर्थार्जनासाठी ह्या नक्षत्रास महत्व आहे. विवाह सोडून सर्व प्रकारच्या शुभ कार्यासाठी हे नक्षत्र शुभ आहे, ह्या नक्षत्रावर सुरु केलेला व्यवसाय हा भरभराटीस येतो, व्यवसायामध्ये स्थिरता प्राप्त होते.          ज्या वेळेस चंद्र त्याच्या स्वराशीत म्हणजेच कर्क राशीत पुष्य नक्षत्रात असतो त्या दिवशी जर गुरवार आला तर गुरुपुष्यामृत हा योग होतो, गुरु ग्रहाचा गुरुवार व शनीचे पुष्य नक्षत्र याच्या एकत्र येण्याने पुष्य नक्षत्राचे गुणधर्म अनेक पटीने वाढतात.          आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा ह्य...

Vastushastra va Vidnyan

           'वास्तुशास्त्र ' हा शब्द उच्चारल्या बरोबर अनेक प्रकारचे मत प्रवाह आपल्या समोर येतात, या मध्ये कोणी या शास्त्राचे अंधपने समर्थन करतात तर कोणी याला शुद्ध फसवणूक मानून जीवतोडून विरोध करतात. या दोन्ही भूमिका ह्या टोकाच्याच, वास्तविक पाहता एक दोन नियमांची पूर्तता होणे किवा न होणे म्हणजे कोणतेही शास्त्र होत नाही समर्थन करणार्यांना तरी पूर्णपणे माहिती असते असे नाही, एखादा दुसरा अनुभव काय तो पाठीशी असतो तर दुसरीकडे जुजबी माहितीच्या आधारे स्वतःला विज्ञाननिष्ट म्हणून घेण्याच्या नादात निव्वळ विरोधाला विरोध होताना दिसतो. तसे पाहता कोणतेही शास्त्र हे शास्त्र म्हणून स्वीकारताना त्या शास्त्रातील प्रत्तेक नियमांना विविध कसोटीवर तपासून पहिले पाहिजे. ज्या प्रमाणे प्रत्तेक शास्त्रातील नियम हे स्थळ, काळ, वेळ सापेक्ष असतात आणि म्हणूनच त्या नियमांना अपवाद हि असण्याची शक्यता असते, त्याच प्रमाणे वास्तुसास्त्राचा तर्कशुद्ध विचार होणे आवश्यक आहे.                निसर्गाच्या प्रत...