वास्तुशास्त्र म्हणजे काय ? आणि वस्तूदोषाचे परिणाम ...
वास्तूशास्त्र म्हणजे नेमकं काय ? असा प्रश्न अनेकांना पडत असतो. या शब्दाची फोड केली तर आपल्याला त्यातून उत्तर मिळेल. ‘वास्तू’ म्हणजे मानवनिर्मित अशी जागा जी माणसाने स्वतःच्या निवाऱ्यासाठी कृत्रिमरीत्या बांधलेली आहे. जगात जी ठिका णं नैसर्गिकरित्या उपलब्ध आहेत त्याला आपण वास्तू म्हणून संबोधत नाही. आता ‘शास्त्र’ म्हणजे काय ? तर वर्षानुवर्षे अभ्यास करून एखादी विद्या संपादन करणे आणि त्या अभ्यासपद्धतीद्वारे विशिष्ट समस्यांवर उपाययोजना करणे म्हणजे शास्त्र. जसं वैद्यकीयशास्त्र असतं , संगणकशास्त्र असतं , भौतिकशास्त्र असतं , प्राणीशास्त्र असतं तसच वास्तूशास्त्र! जर आपल्याला शारीरिक अर्थात आरोग्याची तक्रार असेल तर आपण डॉक्टरकडे जातो आणि तो डॉक्टर (वैद्य) संपूर्ण तपासणी करून प्रचलित आणि सिद्ध झालेल्या वैद्यकीय शास्त्राच्या आधारे इलाज करत असतो. या अभ्यासपद्धतीमध्ये वास्तविक घटनांचे निरीक्षण व तर्काधिष्ठित परीक्षण करून प्रत्यक्षात सिद्ध करण्याजोग्या परिणामांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो .त्याचप्रमाणे आपल्या वास्तूत काही दोष असतील आणि त्याचा दुष्परिणाम होत असेल तर वास्तुशास्त्राच्या प्रचल...