गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१२

Ratna Vishwa -Part 2 

 

ऱ्होडोनाइट

 


 

         ऱ्होडोनाइट  हे नाव ग्रीक नाव असून त्याच्या गुलाबी-लाल रंगा वरून पडले आहे, सामान्यपणे ऱ्होडोनाइट हा गुलाबी-लाल रंगाचा आसतो परंतु कधी कधी हे रत्न विटकरी-तपकिरी रंगात हि सापडते, ह्या रत्ना मध्ये थोड्या प्रमाणावर manganese oxide असल्या कारणाने काही ठिकाणी काळे डाग किवा काळ्या रंगाच्या रेषा, छटा दिसून  येतात.
               इतर गुलाबी रंगाच्या रत्ना प्रमाणे हे सुद्धा प्रेमाची उर्जा प्रवाहित करते आणि याचे वैशिष्ठ्य म्हणजे हा प्रेमाचा वर्षाव बाहेरील बाजूस होत असल्या कारणाने भावनिक समतोल साधून माणुसकी वाढवण्यास मदत करते. हे रत्न व्यक्ती व परिस्थिती या दोन्हींना आकर्षित करून अंगी असणाऱ्या असाधारण किंवा
वैशिष्ठ्यपूर्ण गुणाचा उपयोग करण्यास मदत करते. हे रत्न हृदय चक्राशी संमंधित असल्या कारणाने प्रेमाची परीपूर्णता होण्यास तसेच कोणावर प्रेम करण्यास व प्रेम मिळवण्यास प्रेरक ठरते.
           ह्या रत्नाला प्रथमोपचार रत्न हि म्हणतात कारण हे रत्न कोणताही भावनिक आघात सहन करून सवरक्षात्मक उर्जा आत्म्याला देण्याचे काम करते व कोणत्याही प्रकारच्या  आत्मघातकी विचारांपासून दूर राहण्यास मदत करते, ह्या साठी ज्यांचा प्रेमभंग झाल्यामुळे जगण्यासारखे काही नाही असे वाटते आहे, किवा एखादा मानसिक धक्का बसल्याने आत्म हत्तेचे विचार मनात घोळत आहे, किवा आत्म हत्तेचा प्रयत्न केलेला आहे  किवा ज्यांचा सर्वांवरच राग आहे, अशा सर्वान साठी भावनिक अविचाराना दूर सारून प्राप्त परिस्थितीवर मात  करीत,  सर्वाना क्षमा करत आनंदाने जगण्यास मदत करते. तसेच हे रत्न आपण कोणावर आवलंबुन आहोत, आपली कोणाला गरज नाही, आपल्याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे, अशा भावनिक जखमांचा उद्रेक होऊ न देता बऱ्या करण्यास किवा त्याचे चीड-चिडी मध्ये रुपांतर होण्यापासून थांबवण्यास मदत करते. तसेच भूतकाळातील वाइट आठवणीच्या  जखमानावर खपली धरून, नको असलेला भूतकाळ विसरण्यास मदत करते. राग, द्वेष, तिरस्कार, सूड ह्या भावना स्वत:लाच  नष्ट करणाऱ्या प्रवृत्ती आहेत ह्याची ह्या रत्नाच्या वापरणे जाणीव होऊन क्षमा व दया भाव वाढीस लागतो. तसेच अपमान, तिरस्कार ह्या सारख्या भावना मनामध्ये निर्माण होऊ न देता उद्दिष्टावर लक्ष केंद्रित ठेऊन ध्येयपथावर राहण्यास प्रोत्साहित करते.
             शारीरिक पातळीवर हे रत्न मास पेशी  व हाडांना ताकद देण्याचे काम करते, तसेच यकृतातील विषद्रव्य बाहेर टाकण्यास मदत करून शरीराची चेतना व उर्जा शक्ती वाढवते. पित्ताशयातील खडे, किवा मुतखडा आदींवर मात करण्या साठी ह्या रत्नाचा उपयोग होतो. मास पेशीतील व संद्यातील दाह कमी करून आजार बरे होण्यास मदत करतो, हे रत्न मना बरोबरच शरीर सुद्धा शुद्ध करीत असल्याने, विशेषतः  शरीरात साठलेले अनावश्यक द्रव्य बाहेर टाकण्यास मदत करीत असल्याने काहे अंशी वजन कमी करण्यास उपयोगी पडते.
               ज्योतिष शास्त्रा नुसार रवी, मंगल, बिघडलेले असल्यास, रवी ३,६,७,८,१२ स्थानी असून अशुभ ग्रहांनी युक्त किवा अशुभ दृष्टीत असेल त्यांनी हे रत्न जरूर वापरावे. षष्ट स्थानात शनी असता अथवा
षष्ट स्थानावर शनीची दृष्टी असता अपचन, पोटाचे आजार, तसेच सांधेदुखी होण्याची शक्यता असते अशा वेळेस  ऱ्होडोनाइट हे रत्न वापरणे फायदेशीर ठरते.
डॉ. अभय अगस्ते