सोमवार, १३ जानेवारी, २०२०

ज्योतिषशास्त्राची ओळख भाग १


        मित्रांनो, आज जर तुम्हाला कोण सांगितलं की पृथ्वी या विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि इतर ग्रह त्याच्याभोवती फिरत आहेत आणि सूर्यही पृथ्वीभोवती भ्रमण करत आहे तर तुम्हाला ते पटेल का? तर नाही पटणार. कारण सूर्याभोवती पृथ्वी व इतर ग्रह भ्रमण करत आहेत हे सिद्ध झालेलं विज्ञान आहे. मात्र,तीन शतकांपूर्वी तर अशीच मान्यता होती की पृथ्वीभोवती सूर्य व इतर ग्रह फिरत असतात. तशा परिस्थितीतही, म्हणजे जेंव्हा दुर्भिण व इतर कुठल्याही आधुनिक साधनांचा शोध लागला नव्हता तेंव्हा हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषीं-महर्षींनी ब्रम्हांडात भ्रमण करणार्‍या ग्रहांची, त्यांच्या भ्रमनाची, त्यांच्यागतीची,गुणधर्मांची माहिती घेतली आणि असं एक शास्त्र विकसित केलं ज्याच्या आधारावर पृथ्वीवर राहणार्‍या मानवाच्या भविष्याबद्दल अंदाज वर्तविता येऊ शकतो. होय, आपण बोलत आहोत ज्योतिषशास्त्राबद्दल!
            भविष्य हे प्रत्येक माणसाला खुणावत असतं. भविष्यात काय वाढून ठेवलं आहे याची उत्सुकता आणि भीती माणसाला असतेच. ही भीती आणि उत्सुकता आजची नाही, तर शतकानुशतके अन पिढ्यानपिढ्या ती चालत आली आहे. भविष्य हा असा एकमेव धागा आहे जो मानवासाठी किंवा ब्रम्हांडातील प्रत्येक सजीवासाठी महत्वाचा ठरला आहे.याच भविष्याचा वेध घेता यावा, अंदाज लावता यावा आणि त्यातून अनुकूलता-प्रतिकूलता लक्षात घेऊन सावधानतेने मार्गक्रमण करावे यासाठी ज्योतिषशास्त्र अत्यंत महत्वाचं आहे.
ज्योतिषशास्त्रात प्रामुख्याने ग्रहांचा, त्यांच्या गतीचा,त्यांच्या गुणधर्माचा आणि पर्यायाने त्यांचा मानवी जीवनावर पडणारा प्रभाव याचा अभ्यास केला आहे. ज्योतिषशास्त्र ही एक वैदिक कालीन महत्वाची विद्या आहे. वेदांना जाणून घेण्यास मदत व्हावी म्हणून ज्या सहा वेदांगांची रचना झाली त्यातील ज्योतिष ही एक विद्या आहे. याशिवाय, ज्योतिष हे प्राचीन कालीन खगोलशास्त्रीय ज्ञानाशी निगडीत आहे. कालानुरूप यामध्ये चांगले-वाईट प्रवाह मिसळत गेले.
ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहू आणि केतू या ग्रहांचा अभ्यास आहे. सूर्याभोवती हे सर्व ग्रह भ्रमण करत असतात. प्रत्येकाच्या भ्रमणाचा कालावधी, वेग वेगवेगळा आहे. त्या प्रत्येक ग्रहाची रचना,गुरुत्वाकर्षण, ऊर्जा, चुंबकीय क्षेत्र इत्यादि वेगवेगळे आहे. ज्योतिषशास्त्रात या सर्वांना एका गणिती सूत्रात बांधलेलं आहे. १२ राशी आणि २७ नक्षत्रांच्या रूपात. त्यानुसार, एखादा ग्रह संक्रमण करत असताना तो कोणत्या कक्षेतून भ्रमण करतो, कोणत्या राशीत असतो, कुठल्या नक्षत्रात असतो याचं विश्लेषण करून राशिफळ निश्चित केलं जातं आणि त्यावरून भविष्याच्या संबंधित अंदाज व्यक्त केले जातात. एखादा व्यक्ति जन्मतो तेंव्हा आकाशात ग्रहांची स्थिती काय होती व ती सध्या कशी आहे याचा संयुक्तपणे अभ्यास करून माहितीचं विश्लेषण केलं जातं आणि त्यावरून पुढील काळातील घटनांचा अनुक्रम काय असू शकतो याबद्दल तर्क लावले जातात. यालाच फलज्योतिष म्हणतात! मागील भागात आपण ज्योतिषशास्त्र म्हणजे नेमकं काय? ते कसे काम करते? त्याचा पाया काय आहे? याबद्दल जाणून घेतलं. या भागात त्याबद्दल चे काही गैरसमज आणि त्याचे महत्त्व उदाहरणासह जाणून घेऊ या

सोमवार, ६ जानेवारी, २०२०

अंकशास्त्र म्हणजे काय ? जाणून घ्या अंकशास्त्राची ओळख आणि मार्गदर्शक


 व्यक्ति तितक्या प्रकृती! असं आपण अनेकदा ऐकतो. याचा अर्थ असा की प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र ओळख आहे. स्वभाव, राहणीमान, आवड, क्षमता, गुण-दोष अशा अनेक बाबींवर प्रत्येक व्यक्तीची प्रकृती ठरते. त्यानुसारच आपण त्या व्यक्तिला ओळखत असतो. अंकशास्त्र हे असं शास्त्र आहे ज्याद्वारे कुठल्याही व्यक्तीची प्रकृती कशी आहे याचा अंदाज बांधता येतो.
अंकशास्त्र हे कोणत्याही व्यक्तीच्या जन्मतारीख, नाव याच्या आधारे त्या व्यक्तीची प्रकृती, स्वभाव, गुण-दोष वगैरे जोखण्याचे शास्त्र आहे. ज्याप्रमाणे वास्तुशास्त्रात दिशा,गुरुत्वाकर्षण, ऊर्जा इत्यादींचा अभ्यास आहे त्याप्रमाणे अंकशास्त्रात स्वाभाविकच अंकांचा अभ्यास आहे. प्रत्येक दिशेचा काहीतरी गुणधर्म असतो आणि तो परिणामकारक असतो त्याच पद्धतीने प्रत्येक अंक (उदाहरणार्थ 3) हा आपला स्वतंत्र गुणधर्म राखून असतो जो व्यक्तीवर परिणाम करणारा असतो. अंकशास्त्रात 1 ते 9 या अंकाचा अभ्यास आहे. या प्रत्येकाचे विशिष्ट गुण-दोष आहेत. ते विशिष्ट व्यक्तिबद्दल काय सांगतात आणि ते त्या व्यक्तीवर कसे परिणाम करतील याचा तंत्रशुद्ध अभ्यास करणे अंकशास्त्रात समाविष्ट आहे.
जन्मांक आणि भाग्यांक!                              
            अंकशास्त्रात जन्मांक आणि भाग्यांक हे अभ्यासाचे प्रमुख विषय आहेत असं म्हणता येईल. यासोबत मग नामांक हा विषयही प्रामुख्याने अभ्यासात येतो. प्रत्येक व्यक्तिला जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण असतंच. त्यामध्ये जन्मतारीख यावरून जन्मांक आणि भाग्यांक शोधता येतात. जर समजा अभिषेक नावच्या व्यक्तीची 12/09/1991 ही जन्मतारीख आहे. तर जन्मदिवस 12 यावरून आपल्याला जन्मांक काढता येतो. 1+2=3 हा तो जन्मांक असेल. जर तारीख 1 ते 9 असेल तर तोच त्याचा जन्मांक असेल. भाग्यांक हा पूर्ण जन्मतारखेवरून काढावा लागतो. म्हणजे सदरील व्यक्तीच्या बाबतीत 12/09/1991 यावरून 1+2+0+9+1+9+9+1=5 हा त्याचा भाग्यांक झाला. नामांक जर शोधायचा असेल तर ABHISHEK या नावावरून तो शोधता येईल. प्रत्येक Character हे Alphabet Series मध्ये कोणत्या क्रमांकावर आहे ते शोधून त्यांची बेरीज करणे. त्या सूत्रानुसार ABHISHEK चा नामांक...
A: 1
B: 2
H: 8
I: 9
S: 19:1+9=10=1+0=1
H: 8
E: 5
K: 11:1+1=2
सर्वांची बेरीज 36: 3+6=9
म्हणून नामांक झाला 9.
                                    जन्मांक, भाग्यांक आणि नामांक यांच्या आधारे त्या व्यक्तीचा नैसर्गिक स्वभावगुण समजतो. हे अंक त्याच्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावत असतात. त्या अंकांचे म्हणून जे गुण-दोष आहेत ते त्या व्यक्तिला चिकटलेले असतात.
अंकशास्त्रातून काय साध्य करता येतं? असा जर प्रश्न असेल तर बरंच काही असं त्याचं उत्तर असेल. अंकशास्त्राच्या आधारे त्या व्यक्तितील गुण-दोष, क्षमता,स्वभाव याचा अंदाज लावल्यानंतर त्या व्यक्तीने कोणत्या क्षेत्रात करियर करावे, नोकरी करावी की व्यवसाय करावा,नोकरी कोणत्या क्षेत्रात करावी, व्यवसायात यशस्वी होण्यासाठी काय करावे,जोडीदार निवडताना तो कसा असावा अशा अनेक बाबतीत निर्णय घेताना सुस्पष्टता येते. वाट खडतर आहे की चांगली आहे की आणखी कशी आहे याबद्दल आधीच माहिती मिळते तेंव्हा आपण पूर्ण तयारीनिशी व संसाधणासहित प्रवास सुरू करतो. एकंदरीतच, उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर भविष्यात काय निर्णय घ्यावेत जेणेकरून यश मिळवणे सोपे जाईल, समाधानाच्या मार्गाने वाटचाल करता येईल, आर्थिक समृद्धि कशी नांदेल अशा विविध बाजूंनी वाटचाल करताना अंकशास्त्र मोलाचे मार्गदर्शन करते.
अंकशास्त्रावरून जे सध्या आहे(याचा अर्थ सध्याची परिस्थिति आणि सध्याच्या त्या माणसाच्या क्षमता व मर्यादा) त्यामध्ये बदल कसा करता येईल हा एक महत्वाचा प्रश्न असतो. आधी सांगितल्याप्रमाणे,प्रत्येक अंकाचा गुणधर्म आहे; त्याचे गुण-दोष आहेत. ते त्या व्यक्तीवर कसे परिणाम करतील हे सांगता येईल. मग असलेल्या गुणांची वारंवारता वाढवणे आणि दोषांची परिणामकारकता कमी करणे शक्य आहे. म्हणजे एखादा महिना त्या व्यक्तीसाठी कसा असेल याबद्दल अंदाज आला तर त्या महिन्यात मोठे निर्णय घ्यावेत किंवा घेऊ नयेत हे ठरवता येईल. कोणती तारीख ही लाभदायक आहे ते पाहून निर्णय घेता येतील. जोडीदाराशी पटत नसेल तर त्या दोघांच्या अंकशास्त्रानुसार काय बदल केले पाहिजेत यावर विचार करता येईल. व्यवसायात भागीदार निवडायचा असेल तर त्याबाबतही अंकशास्त्राची मदत होईल. नावात बदल केला तर नामांक बदलेल आणि त्याने जर काही फायदा होत असेल तर तोही मार्ग आहे.
अंकशास्त्र हे उपयुक्त अशासाठी आहे की त्यात त्या व्यक्तिबद्दल लागणारी माहिती फार कमी आहे. म्हणजे त्या व्यक्तीची जन्मतारीख, जन्म वेळ, ठिकाण, नाव ही माहितीच प्रामुख्याने लागते. मिळणार्‍या माहितीचं तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रशुद्ध पद्धतीने योग्य विश्लेषण केल्यास त्याचा फायदा त्या व्यक्तिला नक्कीच होतो.

बुधवार, २५ डिसेंबर, २०१९

वास्तुशास्त्र म्हणजे काय ? आणि वस्तूदोषाचे परिणाम ...

 वास्तूशास्त्र म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न अनेकांना पडत असतो. या शब्दाची फोड केली तर आपल्याला त्यातून उत्तर मिळेल. ‘वास्तू’ म्हणजे मानवनिर्मित अशी जागा जी माणसाने स्वतःच्या निवाऱ्यासाठी कृत्रिमरीत्या बांधलेली आहे. जगात जी ठिकाणं नैसर्गिकरित्या उपलब्ध आहेत त्याला आपण वास्तू म्हणून संबोधत नाही. आता ‘शास्त्र’ म्हणजे काय? तर वर्षानुवर्षे अभ्यास करून एखादी विद्या संपादन करणे आणि त्या अभ्यासपद्धतीद्वारे विशिष्ट समस्यांवर उपाययोजना करणे म्हणजे शास्त्र. जसं वैद्यकीयशास्त्र असतं, संगणकशास्त्र असतं, भौतिकशास्त्र असतं,प्राणीशास्त्र असतं तसच वास्तूशास्त्र! जर आपल्याला शारीरिक अर्थात आरोग्याची तक्रार असेल तर आपण डॉक्टरकडे जातो आणि तो डॉक्टर (वैद्य) संपूर्ण तपासणी करून प्रचलित आणि सिद्ध झालेल्या वैद्यकीय शास्त्राच्या आधारे इलाज करत असतो. या अभ्यासपद्धतीमध्ये वास्तविक घटनांचे निरीक्षण व तर्काधिष्ठित परीक्षण करून प्रत्यक्षात सिद्ध करण्याजोग्या परिणामांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो.त्याचप्रमाणे आपल्या वास्तूत काही दोष असतील आणि त्याचा दुष्परिणाम होत असेल तर वास्तुशास्त्राच्या प्रचलित व सिद्ध नियमांनुसार त्यावर उपाययोजना करता येतात.

वास्तुशास्त्रात दहा दिशा, पंचमहाभूते, गुरुत्वाकर्षण, चुंबकीय ऊर्जा, सूर्याची किरणे व वैश्विक ऊर्जेचा प्रामुख्याने अभ्यास करून आपली वास्तू कशी असावी याबद्दल संकेत दिले आहेत. ज्यावेळी आपण वास्तू स्थापित करतो त्यावेळी या ऊर्जेची विभागणी होते आणि ऊर्जेचे प्रवाह अस्थिर होतात. अर्थातच या सर्व घटकांचा परिणाम त्या वास्तूत राहणाऱ्या प्रत्येकावर होत असतो. 
ज्याप्रमाणे वाहणार्‍या नदीला बांध घातला तर प्रवाही नदी थांबते त्याप्रमाणे वास्तुच्या रचनेमुळे प्रवाही ऊर्जा व इतर घटक तिथे बंदिस्त होतात.

वास्तूमध्ये दोष असणे म्हणजेच वास्तूच्या रचनेमुळे आणि वास्तूमधील मांडणीमुळेसतत प्रवाहित असणाऱ्या उर्जेचे असंतुलन. म्हणजे नकारात्मक ऊर्जेचा वास्तूमध्ये जास्त वावर आणि सकारात्मक ऊर्जेला झालेला प्रतिबंध. ज्यावेळी त्या वास्तूचा सखोल अभ्यास करून वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार त्याची रचना केली जाते तेंव्हा हा दोष दूर करता येतो.

उदाहरणार्थ, ईशान्य दिशा सकारात्मक ऊर्जा देणारी दिशा आहे आणि नैऋत्य दिशा नकारात्मक ऊर्जा देणारी दिशा आहे. मग ईशान्य दिशेकडून येणार्‍या सकारात्मक दिशेला कमीत कमी अवरोध व्हावा म्हणून ती दिशा प्रशस्त व मोकळी ठेवता येईल. याविरुद्ध,नैऋत्य दिशेने येणारी नकारात्मक उर्जेला प्रतिबंध व्हावा म्हणून तिकडे अडगळ करता येईल.

वास्तुतील दोषामुळे काय काय परिणाम होऊ शकतात हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. खरं तर हे प्रत्येक वास्तूच्या रचनेवर अवलंबून असतं. कोणत्या दिशेच्या असंतुलित असल्याने कोणती नकारात्मक ऊर्जा अधिक निर्माण होते यावर ते अवलंबून असतं.पण साधारणपणे, घरामधील माणसांची सततची आरोग्याची समस्या, घरात पैसे (अर्थात लक्ष्मी) न येणे किंवा पैसे न टिकणे, सततच्या आर्थिक अडचणी, कौटुंबिक कलह, लग्न न जमणे, मुलांचे अभ्यासात लक्ष न लागणे, करिअर संबंधित अडचणी, यश न येणे अशा अनेक प्रकारच्या समस्यांना वास्तूतील दोष कारणीभूत असू शकतात.
बर्‍याचदा वास्तू दूषित असल्यास त्याचे यापेक्षाही गंभीर परिणाम भोगावे लागतात. मानसिक आरोग्यावर त्याचा तीव्र परिणाम होऊ शकतो. आरोग्याच्या समस्या जटिल होऊन अकाली मृत्यूही ओढवतात. कितीही प्रयत्न केले तरी हातातोंडाशी आलेलं यश एका क्षणात अपयशात रूपांतरित होतं. मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतं आणि होत्याचं नव्हतं होतं. वास्तू दूषित असेल तर असे प्रकार घडतात याला अनेक प्रमाण आहेत, अनेक प्रसंग आहेत आणि त्याचा अनुभव घेणारे जीवंत माणसंही आहेत.

मानवी शरीर हेसुद्धा पंचमहाभूतांपासूनच बनलेलं आहे आणि मानवी मनावर अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींचा परिणाम होत असतो. लक्षावधी किलोमीटर अंतरावर असलेल्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण लहरींमुळे अथांग सागराला उधाण येतं तर मानवी मनावरही या वैश्विक ऊर्जा, गुरुत्वाकर्षण इत्यादींचा परिणाम होतच असतो. आपलं शरीर निरोगी राहावं यासाठीकाळजी घ्यावी लागते तसेच आपण जिथे वास्तव्यास असतो त्या वास्तूचीही काळजी घेतली तर तीही तितकीच सदृढ राहील. जर शरीराला व्याधी झाली तर डॉक्टरकडे जावं लागतं तसं वास्तूत दोष असतील तर ते वास्तूशास्त्र तज्ञाकडे जाऊन त्यातील दोष नाहीसे करून घेणं गरजेचं आहे.

शास्ति च त्रायते च। शिष्यते अनेन।

अर्थात,जी अभ्यासपद्धती आपल्याला शिस्त लावते, आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करते, आपलं रक्षण करते त्याला शास्त्र म्हणतात! त्या शास्त्राने दाखवलेल्या मार्गावर चालणे हे आपल्या आदर्श जीवनशैलीचा भाग आहे.
*-*-*

गुरुवार, १२ डिसेंबर, २०१९

ज्योतिषशास्त्र आणि करियर - आपण योग्य करियर निवडीसाठी ज्योतिषशास्त्राची कश्याप्रकारे मदत घेऊ शकतो


प्रत्येक पालक आपल्या मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. काहीही झालं तरी आपला मुलगा किंवा मुलगी आजच्या स्पर्धेच्या युगात मागे राहू नये यासाठी पालक वाट्टेल ते करायला तयार असतात. आपली अपूर्ण स्वप्ने आपल्या मुलांनी पूर्ण करावीत हे आई-वडिलांचं स्वप्नं असतंच. त्यासाठी मग आई-वडील आपल्या मुलांना त्यांनी नेमलेल्या मार्गावर चालायला लावत असतात. कधी शेजारच्या पांडेच्या मुलाला सरकारी नोकरी लागगल्यावर त्या कुटुंबाची झालेली भरभराट आई-वडिलांच्या डोळ्यासमोर असते तर कधी नात्यातील कोणीतरी एखाद्या टीव्ही शो मध्ये जाऊन सगळ्या नातेवाईकांमध्ये कौतुकास पात्र ठरलेलं त्यांनी पाहिलेलं असतं. मग हेच यश, हीच लोकप्रियता आपल्या मुलांच्या वाटेला यावी असं पालकांना वाटत असतं. त्यालाच यश समजून आई-वडील आपल्या मुलांना त्या मार्गावरील स्पर्धक बनवतात.
प्रत्येक कुटुंबाच्या गरजा वेगवेगळ्या असतात. काही कुटुंबात आर्थिक स्थैर्य प्राप्त करणं खूप महत्वाचं असतं. त्यासाठीचा भार घरातील पुढच्या पिढीच्या खांद्यावर असतो. आपल्या मुलांनी लवकर शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळवावी असं एकच स्वप्नं घेऊन पालक जगत असतात.
यावरून एक गोष्ट सिद्ध होते की आपल्याकडे शिक्षण हा व्यक्तीगत आवडीचा आणि क्षमतेचा विषय नसून तो कौटुंबिक आकांक्षा व सामाजिक प्रतिष्ठेचा विषय आहे. मुलांना कोणत्या विषयात रस आहे, कोणत्या विषयात गती आहे आणि तो कोणत्या क्षेत्रात चांगल्या पद्धतीने कार्यरत राहून यश प्राप्त करू शकतो याकडे पूर्णतः दुर्लक्ष होतं. बर्‍याचदा कला क्षेत्रात आवड आणि गती असलेल्या मुलाला आई-वडिलांच्या हट्टामुळे म्हणा किंवा मित्रांच्या बरोबरीने अभियांत्रिकीचं शिक्षण घ्यावं लागतं. पण त्या विषयात त्यांचा रस नसल्याने त्यांची प्रगति खुंटते. मग विनाकारण त्या क्षेत्रात तगून राहण्याचा अट्टहास सुरू होतो. दुर्दैवाने, स्वतःची आवड, स्वतःच्या मर्यादा आणि मुख्य म्हणजे स्वतःचे उपजत गुण माहीत नसल्याने त्या मुलाचं आणि सोबतच त्या कुटुंबाचं भवितव्य अधांतरी राहतं.
हे केवळ एक उदाहरण आहे. ज्यांचा स्वभाव कमी बोलण्याचा असतो त्यांना मार्केटिंग क्षेत्रात यश मिळवता येईल का? ज्यांचा स्वभाव चंचल आहे त्यांनी प्रचंड एकाग्रता लागणार्‍या शल्य चिकत्सक क्षेत्रात पाऊल टाकावं का?
यावरून एक स्पष्ट आहे की मुलांनी त्याच क्षेत्रात शिक्षण घ्यावं आणि करियर करावं ज्या क्षेत्रात त्यांना आवड असेल आणि गती असेल. येथे महत्व प्राप्त होतं ते Career Counseling अर्थात करियर समुपदेशन किंवा मार्गदर्शन! मुलांच्या अंगी असलेले उपजत गुण, त्यांची आवड, जन्मतः मिळालेले गुण-दोष आणि त्यांच्या एकंदरीत स्वभावगुणांच्या अनुषंगाने सोपे असणारे क्षेत्र शोधून त्यांना त्या मार्गावर वाटचाल करायला लावणे.
कुंडलीमध्ये विविध ग्रह असतात हे तर सर्वांनाच माहिती आहे. पण त्या प्रत्येक ग्रहाचा एक कार्यकारण भाव असतो. कोणता ग्रह कोणत्या स्थानी असल्यावर त्याचा मनुष्यावर कसा परिणाम होतो हेसुद्धा निश्चित असतं. जसा माणसाचा एक गुणधर्म असतो तसा ग्रहांचाही असतो. कार्यक्षेत्राच्या बाबतीत सांगायचं तर जसा शुक्र ग्रह कला, साहित्य या क्षेत्रांशी निगडीत आहे. गुरु ग्रह बुद्धीशी निगडीत कार्यक्षेत्राशी संबधित आहे. हे ग्रह आपल्या पत्रिकेत कोणत्या स्थानी आहेत त्यानुसार आपली आवड, आपला स्वभाव, आपल्या क्षमता, आपल्या मर्यादा ठरत असतात. याचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करून त्या मुलाने-मुलीने करियरसाठी कोणतं क्षेत्र निवडलं पाहिजे हे ठरवल्यास पुढील वाटचाल सोपी होते.
काही वेळा सर्व काही योग्य असूनही यशप्राप्ती होत नसते. त्याला ग्रहांची महादशा कारणीभूत असते. याअनुसार, ग्रहांच्या स्थितीचा त्या व्यक्तीवर असा काही परिणाम होत असतो की तो विशिष्ट काळ त्या व्यक्तीसाठी खडतर असतो आणि त्या कालावधीसाठी हवं असलेलं प्राप्त करणं कठीण असतं.
आजच्या जगात कार्यक्षेत्र म्हणून आपल्यासमोर अनेक मार्ग उपलब्ध असतात. त्यातील नेमका कोणता आपल्यासाठी उचित आहे हे या समुपदेशनातून जाणून घेता येईल. ग्रहांच्या दशेवरुन योग्य दिशा जाणून घेणे हे काम आपल्याला करायचं असतं.
आपण जेथे कार्यरत असतो आणि तेथे यश मिळत नसेल तर आपण निवडलेला प्रांत चुकीचा आहे असं नंतर वाटू शकतं. मग पुन्हा परिस्थितीच सुरुवातीपासून अवलोकन केलं जातं आणि शेवटी ज्ञात होतं की आपण जे करतोय त्यासाठी बनलेलोच नाहीत. मग सगळी चक्र उलटी फिरवावीशी वाटतात. कधी कधी इतका उशीर झालेला असतो की परतीचे सर्व मार्ग बंद झालेले असतात. हे सगळं टाळण्यासाठी आधी आपण स्वतःबद्दल जाणून घेऊन योग्य दिशेने वाटचाल सुरू केली तर आपल्या आयुष्यचं गलबत चुकीच्या मार्गाने जाणार नाही.



गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०१७

Vaastushastra & Marriage

 Vastu and Marriage

 वास्तुशास्त्रा प्रमाणे वातावरणात पंचमहाभुतांचे अस्तित्व हे मुक्त स्वरुपात असते. परंतु जेव्हा त्यांना चार भिंतीमध्ये बंदिस्त केले जाते त्या वेळेस त्यांचे आठ दिशांबरोबर संबंध प्रस्थापित होतात. चार मुख्य दिशा, चार उपदिशा या बरोबर आकाशाकडील दिशा म्हणजे अनंत ही नववी अधर म्हणजे भूमी ही दहावी दिशा. अशा दहा दिशांचा विचार वास्तुशास्त्रात केला गेला आहे. वास्तुरचने नुसार दिशांचा, पंचतत्त्वाचा, भूमीच्या उर्जेचा परिणाम वास्तुत राहणार्‍या व्यक्तींवर होत असतो. वास्तुशास्त्राच्या मुळ ग्रंथामध्ये भूमी व भूमी ऊर्जा यांचा सर्वाधिक विचार केलेला असून प्रत्येक ग्रंथात एक तृतिअंश लेखन वास्तूसाठी भूमीची निवड कशी करायची यावरच आहे. भूमीची शुभता अशुभता भूमीतून प्रस्फुटीत होणार्‍या ऊर्जेवर अवलंबुन असते. भूमीच्या ऊर्जेचा दुरगामी परिणाम मनुष्य जीवनावर झाल्याचे दिसून येते. भूमी बरोबरच अष्टदिशा (काही ग्रंथाप्रमाणे सोळा दिशा), पंचतत्त्व या ऊर्जेचा परिणाम हा त्या वास्तुत राहणार्‍या व्यक्तीवर होतो. यास्तव मनुष्य ज्या वास्तुत राहतो त्या वास्तुतील ऊर्जेचे परिणाम त्याच्या विचारांवर प्रभाव टाकतात. विचारातून भावनांची निमिर्ती होते, भावनेतून कृती आणि कृतीतून परिणाम समोर येतात. अशाप्रकारे अप्रत्यक्षरित्या आपण राहत असलेली वास्तु आपल्या यशापयसास कारणीभूत ठरते.
वास्तुशास्त्रात जीवनातील प्रत्येक अंगाचा विचार केलेला असल्याने विवाह आणि त्यात वास्तु शास्त्रामुळे येणारे अडथळे याचा विचारही साहजिकच केला गेला. वास्तुशास्त्रानुसार योग्य वयात विवाह होण्यासाठी वास्तुतील चारही उपदिशा व उत्तर दिशा दोष विरहीत असणे जरुरी आहे. जन्म कुंडली प्रमाणे योग्य वयात विवाह योग दर्शवलेला असूनही वास्तुमुळे विवाह ठरण्यास अडथळे येत असेल तर, वास्तुतील ईशान्य, अग्नेय, नैऋत्य, वायव्य व उत्तर दिशांमधील दोष कारणीभूत ठरतात. या पाचही दिशाच्या गुणधर्मांचा व कारकत्वाचा सविस्तर विचार करणे गरजेचे आहे.
ईशान्य-पंचतत्वा मधील जल तत्वाची येथे अधिकता येत असल्याने स्वच्छता, विचारांमध्ये स्पष्टता, नविन कल्पना देणारी, मनाला ग्रहणशील अवस्थेत घेऊन जाणारी आणि जीवनाबद्दल मोठा दृष्टिकोन देणारी ही दिशा आहे. ईश्वराचे अधिष्ठाण याच दिशेला असते. या दिशेतील दोष हा जीवनाबद्दल संकुचित विचार व असुरक्षितता निर्माण करतो. प्रत्येक संधीला अडथळा समजून पुढे जाण्याची भिती वाटायला लागते. यातून दैनदीन गरजेच्या गोष्टी जमवण्यास लक्ष केंद्रीत करण्यास भाग पाडते, त्यामुळे विवाहाचा विचारच केला जात नाही आणि इतरांनी आग्रह केल्यास पुढे जाण्यास भिती वाटते. विचार स्पष्ट नसल्याने जोडीदाराकडून काय अपेक्षा आहे यामध्येच गोधळ असल्याने कुठल्याही त्रुटी शोधल्या जातात. साधारतणत: या दिशेत असलेली अस्वच्छता, शौचालय, अडगळ किंवा अवजड सामान, उंच टेकडी, उंच बांधकाम, कचराकुंडी असल्यास या दिशेत दोष निर्माण होतो.
अग्नेय- विवाह व वैवाहीक सौख्य यावर अधिपत्य गाजवणार्‍या शुक्राची ही दिशा आहे. अग्नी सुरक्षिततेचे प्रतीक असून जीवनात जोश व उत्साह यांचे प्रतिनिधीत्त्व करते. अग्नी उर्जा रुपांतरीत करुन मार्गक्रमित होत असल्याने ज्या ठिकाणी आकर्षण असते तिथे अग्नी तत्व असते. समाजामध्ये यश व विशिष्ट ओळख निर्माण करणारी ही दिशा असून आत्मविश्वास देण्याचे कार्य करीत असल्याने या दिशेतील दोष हा घरातील व्यक्तीना विनाकरण अपयश देतो. स्वत:ची ओळख निर्माण होत नाही. प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागते. आत्मविश्वास कमी होऊन जीवन भयग्रस्त होते. अग्नेय दिशेतील मोठी वाढ ही स्वत: बद्दल मोठ्या प्रमाणावर अहंकार निर्माण करते. समाजातील स्थान, प्रतिष्ठा याला जास्त महत्व दिले जाते. शुक्र ग्रहाची दिशा बिघडल्यामुळे शुक्राच्या गुणधर्माणा ‘स्पार्क’ न मिळाल्याने भावी जोडीदारा प्रती आकर्षण निर्माण होत नाही. सौंदर्य व कामवासना या बाबतीत भ्रामक कल्पना बाळगल्याने नकार येतो अथवा दिला जातो. या दिशेस विहीर, तलाव, पाण्याची टाकी, खड्डा, उतार असल्यास तसेच ही दिशा कट झाल्यास किंवा मोठ्या प्रमाणावर वाढल्यास अग्येय दिशेत दोष निर्माण होतो.
नैऋत्य- वास्तुदेवता मंडळातील पितृ या देवतेचा स्थान असलेली ही दिशा. जीवनामध्ये वंश विस्ताराचे, विवाह सारखे मंगल कार्य घडऊन आणण्याची जबाबदारी पितृकडे असते. या बरोबर पृथ्वी तत्वाची ही दिशा आहे. धैर्य, संतुलन, खंबिरपणा, स्थिरता, विकसित व्यक्तीमत्त्व देण्याचे काम ही दिशा करते. नवीन नाते संबध निर्माण करण्याबरोबरच रक्ताच्या नात्यात घनिष्ठता निर्माण करणारी ही दिशा आहे. सफल आणि समृद्ध जीवनासाठी जे केले पाहीजे त्यासाठी लागणारे प्रयत्न करण्यास प्रोत्साहन देणारी ही दिशा आहे. यर दिशेतील दोष हा नविन नाते निर्माण होण्यासाठी पोषक वातावरणाला बाधक ठरतो. जुन्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतो. जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये अस्थिरता येते. घरातील लोकांमध्ये आळस, कंटाळा, शक्तीहीनता वाढते. परीवारत तणाव असल्याने नविन नाते जोडण्यास भिती वाटते. परिवाराकडून या दृष्टीने प्रयत्न केले जात नाही. नोकरी, व्यवसायात अस्थिरता असल्याने विवाहासाठी जोडीदार मिळण्यात अडचणी येतात.
नैऋत्य दिशेस खड्डा, विहीर, जमीनीखालील पाण्याची टाकी, सेप्टीक टँक इत्यादी असणे तसेच ही दिशा वाढलेली असणे अथवा कट झालेली असणे, नैऋत्य दिशेस उतार अथवा टेरेस, या पैकी काहीही असल्यास नैऋत्य दिशा बिघडून त्या दिशेत दोष उत्पन्न होतात.
वायव्य-मनाची चंचलता दर्शवणार्‍या चंद्र ग्रहाची तर कायम अस्थिर असलेल्या वायू तत्वाची ही दिशा आहे. प्रसिद्धी अथवा कुप्रसिद्धी पसरवणे हे या दिशेचे गुणधर्म आहेत. संतुलित वायुतत्त्व हे वृद्धीकारक आहे. याचा संबध गतीशी असल्याने सशक्त संबध प्रस्थापित करुन मोठ्या यशामध्ये परावर्तित करण्याचे कार्य यादिशे मार्फत होते. शरीर, मनाला आनंद देणार्‍या बाबींचा विचार याच दिशेवरुन केला जातो. ही दिशा संबंध निर्माण करणारी दिशा असल्याने, संपर्क वाढून नविन नाते जोडण्यासाठी फारच महत्वाची मानली जाते. समाजामध्ये असलेली पत हे या दिशेच्या शुभ-अशुभत्वावर अवलंबुन असते. विवहा ठरुन मोडणे यात याच दिशेच्या गुणधर्माचा अधिक वाटा असतो. तसेच या दिशेस असलेल्या वायू तत्त्वाच्या गुणधर्मानुसार येथे ठेवलेली कुठलीही वस्तू कायम स्वरुपी स्थिर राहत नाही. वास्तुशास्त्रा नुसार या दिशेस पाहुण्याची खोली किंवा विवाह योग्य मुलींची खोली ठेवण्यास सुचवले जाते. या दिशेतील दोष संपर्क प्रणाली कमकुवत करते, नविन नाते जोडण्यात अपयश येते, अपेक्षांची पूर्तता होत नाही. मन अस्थिर झाल्याने योग्य निर्णय घेता येत नाही. चुकीच्या व्यक्ती संपर्कात येऊन त्याचे पुढे विवाहात रुपांतर होऊ शकत नाही. प्रत्तेक स्थळाप्रती असमाधानी वृत्ती वाढल्याने गाडी पुढे सरकत नाही. वायव्य दिशा कट झाल्यास किंवा वाढल्यास, नैऋत्य दिशेपेक्षा उंच असल्यास, वायव्य दिशेस विहीर असल्यास किंवा टेरेस असल्यास या दिशेत दोष असतो. 
उत्तर दिशा- वास्तुशास्त्रानुसार धन कारक म्हणून या दिशेकडे पाहिले जाते. घरात पैसा कोणत्या मार्गाने येणार आहे,याचे उत्तर ही दिशा दर्शर्वित असते परंतु धना बरोबरच नवीन संधी निर्माण करण्याचे दायित्त्व उत्तर दिशेकडे आहे. उत्तर दिशा ऊर्जेची उगम दिशा असल्याने प्रत्येक प्रश्‍नावर उत्तर शोधण्यास मदतगार ठरते. या दिशेत दोष असल्यास चांगली संधी उपलब्ध होत नाही, त्यामुळे स्वत:ला सिद्ध करता येत नाही. अर्थातच योग्य स्थळ सांगून येत नाही, सर्व काही ठिक असून समोरुन प्रस्ताव येत नाही अथवा नाकारला जातो. काहीतरी कारण सांगून चालढकल केली जाते. दुसर्‍या ठिकाणी लग्न जुळल्याचा निरोप येतो. अशा रितीने सुयोग्य स्थळ हातचे निघून जाते. उत्तर दिशा बंद असणे, उत्तरेस टेकडी किंवा चढ अथवा शौचालय असणे किंवा सेप्टीक टँक असणे, उंच बांधकाम, स्वयंपाकगृह असणे इत्यादी रचना ही उत्तर दिशेत दोष निर्माण करतात.
अशा प्रकारे आपल्या वास्तुतील दोष अप्रत्यक्षपणे घरात मंगल कार्य घडवण्यास अडथळा निर्माण करु शकते. यासाठी योग्य वास्तुतज्ञाचा सल्ला घेऊन अडथळा दूर केल्यास घरात मंगलकार्य विनासायास पार पडते.
डॉ. अभय अगस्ते
संचालक , 
ज्योतिष-वास्तु सायन्स इन्स्टिट्युट ऍन्ड रिसर्च सेंटर

शनिवार, २ जुलै, २०१६

Importance of Astrology in life

        Importance of Astrology in life

         साधारण पणे चाळीस ते बेचाळीस वयाची एक व्यक्ती  ऑफिस मध्ये थोडीशी गोंधळलेल्या  स्थितीत माझ्या समोर येऊन बसली. सर आपली आत्ताची भेटण्याची वेळ ठरली होती इत्यादी ....
माझ्या समोर बसत असताना मी त्या व्यक्तीस न्याहाळत होतो. काहीतरी गंभीर प्रश्न असून समोरील व्यक्ती अडचणीत आहे हे चेहऱ्यावरून जाणवत होते
         मला जन्म टिपण दिल्यावर, मला नोकरी नाही, माझी नोकरी गेली आहे.माझ्यावर दोन मुले आणि पत्नी ह्यांची जबाबदारी आहे  आणि आता नोकरी सुद्धा मिळत नाहीये. नोकरी मिळण्यासाठी काय करू? का एखादा व्यवसाय सुरू करू? पण व्यवसाय साठी कोणतेही भांडवल माझ्याकडे नाही. आता काय करू?
त्याचे प्रश्न सुरू असताना मी त्याची जन्म कुंडली प्रिंट आउट काढून नोकरी व्यवसायाच्या अनुषंगाने अवलोकन सुरू केले.
         जन्म कुंडली व महादशा  ह्यांचा विचार करून मी माझी काही अनुमाने तयार केली. त्या दृष्टीनं जातकाला आतापर्यंत कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या केल्या असे विचारले असता आत्ता पर्यंत मार्केटिंग मध्ये अनेक जॉब केले असून प्रत्येक जॉब मध्ये सिनियर्स व बॉस ह्यांच्या त्रासाला कंटाळून नोकरी सोडली किंवा कंपनी बंद पडल्यामुळे नोकरी गेली. असे सतत चालू आहे.  
        मार्केटिंग मध्ये काम करण्यासाठी आवश्यक घटकांची पूर्तता जन्म कुंडली दर्शवत नव्हती. म्हणजे आतापर्यंत निवडलेले कार्यक्षेत्रच चुकीचे होते हे लक्षात येते.
          असे अनेकांच्या बाबतीत घडत असते,दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गरजां साठी काही ना काही तरी केले जाते, त्यातून उदरनिर्वाह होतो पण योग्य ती प्रगती मात्र होत नाही.कुठे तरी परिस्थितीमुळे म्हणा अथवा कोणत्याही कारणाने काही तरी निर्णय घेतले जातात, आणि आता मागे हटल्यास, आपले कसे होईल ह्या भीतीने तसेच पुढे जातात काही काळ नंतर चूक कळते पण काळ पुढे गेलेला असतो. असो ....
        जातकाच्या जन्म कुंडली चा विचार करून त्याला सर्व्हिस सेक्टर मधलाच एक व्यवसाय सुचवला ज्यासाठी भांडवलाची गरज नव्हती. मी सुचवलेल्या विषयात जातकाला आवड सुद्धा होती व हा व्यवसाय करावा असे अनेक वर्षा पासून त्याच्या मनात होते पण हिम्मत होत नव्हती.
         सोने जमिनीत सापडते म्हणून कुठेही खणले तर  सापडत नाही, परंतु भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून विशिष्ट ठिकाणी खणल्यास सोने सापडण्याची शक्यता बळावते. अगदी तसेच आपले असते,योग्य दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल यशाच्या शिखरावर घेऊन जाते अन्यथा फक्त अंतर मागे टाकले  जात असते.
        कुंडलीच्या योग्य विश्लेषणा द्वारे त्याच्या यशाचा मार्ग त्याला सापडला होता. 
कोणत्याही प्रकारच्या ज्योतिष मार्गदर्शना साठी संपर्क
Dr. Abhay Agaste
+91 9922445272  or  Send query on  abhayagaste@gmail.com
 

Importance of Astrology in life

A near about 40-42 age person sit in front of me, with a little bit of confusion. Sir, I have booked today’s appointment. Yes I am expecting you I answered.
                While seating in front of me I was observing him. Something serious question he is having and person is in distress was evident from his face.
                After given his birth details, he starts to speak.  I have no job, I lost my job, two children and wife is my responsibility, and now not getting new job also.  What to do to get a job? Why not start a business? But I don’t have any capital for business. Now what to do?
                While his questions were going on, I prepared his horoscope and started to study in terms of service and business.  Considering his horoscope and vishottari dasha made some conjectures and in terms of that I asked what kind of job you did so far? He answered he has been in several marketing job. In each because of boss trouble l left the job or because of company fell off.  This is continuous going on.
                Factors necessary to work in marketing did not reflect in his horoscope. So far it appears that he ware selected wrong province of job. This happens with many people. Although people do something needed for Daly life is only useful to survive but not sufficient to give progress.
                Just because of the circumstances or when decisions are taken that for any reason, and if I go back now, how will be my life? Is the reason behind the stuck up with present condition. After some time they come to know how wrong they was, but time has passed. So on….
                Now come to this point, as per his horoscope I suggested him business in service sector. Which do not need any capital.  He was also interested in the same subject suggested by me, and from many years in his mind to do such business but not dare to do so.
                As gold found in soil but not every ware you dig. If you study the geographical situation and dug to specific area it will increase the chances of finding god. The same thing happens in our life also, each step in right direction bring you towards success of the summit, otherwise only forereach the distance.
                By his horoscope analysis he got the war of success.

For Any astrological query and guidance contact
Dr. Abhay Agaste
+91 9922445272  or  Send query on  abhayagaste@gmail.com