'वास्तुशास्त्र ' हा शब्द उच्चारल्या बरोबर अनेक प्रकारचे मत प्रवाह आपल्या समोर येतात, या मध्ये कोणी या शास्त्राचे अंधपने समर्थन करतात तर कोणी याला शुद्ध फसवणूक मानून जीवतोडून विरोध करतात. या दोन्ही भूमिका ह्या टोकाच्याच, वास्तविक पाहता एक दोन नियमांची पूर्तता होणे किवा न होणे म्हणजे कोणतेही शास्त्र होत नाही समर्थन करणार्यांना तरी पूर्णपणे माहिती असते असे नाही, एखादा दुसरा अनुभव काय तो पाठीशी असतो तर दुसरीकडे जुजबी माहितीच्या आधारे स्वतःला विज्ञाननिष्ट म्हणून घेण्याच्या नादात निव्वळ विरोधाला विरोध होताना दिसतो. तसे पाहता कोणतेही शास्त्र हे शास्त्र म्हणून स्वीकारताना त्या शास्त्रातील प्रत्तेक नियमांना विविध कसोटीवर तपासून पहिले पाहिजे. ज्या प्रमाणे प्रत्तेक शास्त्रातील नियम हे स्थळ, काळ, वेळ सापेक्ष असतात आणि म्हणूनच त्या नियमांना अपवाद हि असण्याची शक्यता असते, त्याच प्रमाणे वास्तुसास्त्राचा तर्कशुद्ध विचार होणे आवश्यक आहे.
निसर्गाच्या प्रत्तेक अंगाचा विचार करून बनवलेले शास्त्र असे माझे वास्तूशास्त्रा बद्दल मत आहे, निसर्ग चक्राशी संमाधित पंचमहाभूते व अष्ट दिशा ह्यांची सांगड घालून तयार झालेले शास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र असे याचे वर्णन केले जाते, ह्या शास्त्राला पाच हजार वर्षाची परंपरा आहे, अनेक महान ऋषी मुनींनी परिश्रम घेऊन मानव कल्याणा साठी ह्या शास्त्राची निर्मिती केली आहे एवढ्या वर्षांची परंपरा असलेले शास्त्र पूर्णपणे चुकीचे कसे असेल? परंतु एकीकडे हाही विचार येतो हे जुने झालेले शास्त्र सध्याच्या परिस्थितीत कितपत उपयोगी आहे? ज्या वेळी या शास्त्राची निर्मिती झाली त्या वेळेची भोगोलिक परिस्थिती हि वेगळी होती, नदी किनारी गाव वसत असे, दळण वळणाची फारशी साधने नव्हती, मुबलक प्रमाणात जमीन उपलब्ध होती त्या मुळे कोणती योग्य व कोणती ताज्य अशा प्रकरे निवडीसाठी अनेक पर्यायांचा विचार करता येत असे. सध्या जिथे जमीनच मिळणे दुर्मिळ झाले आहे तेथे चौकोनी पाहेजे, वेडी वाकडी नको, अमुक ठिकाणीच उतार पाहिजे अन्य दिशेला नको वैगरे बाबी विचारात घेणे शक्य होत नाही, मिळेल ती जमीन सुविधेच्या दृष्टीने किती सोयीची आहे याचाच विचार केला जातो अशा परिस्थितीत वास्तुशास्त्र उपयोगी पडते का ? कीवा जागेचा कमतरते मुळे अनेक माजली इमारती बांधल्या जाऊ लागल्या त्या मध्ये संपूर्ण बधाकामाचा एखादा कोपरा म्हणजे आपला flat असतो, अशा वस्तूस वास्तूशास्त्र उपयोगाचे आहे का? या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळवण्या साठी वास्तुशास्त्राची परिभाषा माहित असणे आवश्यक आहे, वास्तुशास्त्रातील एक एक नियम घेऊन त्या काळातील परिस्थिती व सद्य स्थिती यातील सर्व बाबी वैज्ञानिक कसोटीवर तपासून, आपणास योग्य तो न्याय निवडा करता यावा म्हणून वास्तुशास्त्राचा वैदिक, योगिक, अध्यात्मिक, व वैज्ञानिक असा तौलनिक अभ्यास "वास्तुशास्त्र व विज्ञान" या लेखमाले द्वारे आपणा समोर मांडत आहे
ज्योतिष-वास्तू तज्ञ
डॉ. अभय अगस्ते